वीज कायदा 2021 च्या विरोधात वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी जाणार देशव्यापी संपावर.

229

गडचिरोली:- केंद्र सरकारच्या वीज उद्योगाच्या खाजगीकरण , फ्रेंचायसी करण धोरणाविरुद्ध ऊर्जा क्षेत्राच्या संपूर्ण खाजगी करण कारणास्तव केंद्र सरकारने प्रस्तावित विद्युत संशोधन विधेयक 2021 लोकसभेच्या पावसाळी सत्रात पारित करण्याच्या विरोधात राज्यातील वीज कर्मचारी अभियंते अधिकारी संपावर जाणार असल्याची माहिती महावितरण च्या गडचिरोली सर्कल कार्यालयासमोर 09 ऑगस्ट रोजी झालेल्या द्वार सभेत संयुक्त कृती समिती द्वारा कळविण्यात आले आहे.
राज्यातील 96 हजार वीज कर्मचारी त्यात गडचिरोली सर्कल अंतर्गत 5000 कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. कर्मचारी. अभियंता, अधिकारी यांच्या संपामुळे वीज सेवेवर परिणाम होणार आहे. वीज उद्योगांचे खाजगीकरण केल्यास गोरगरीब जनतेला सवलतीमध्ये होणारा वीजपुरवठा येत्या काळात मिळणार नाही. खाजगी उद्योजक मनमानी दरात वाटेल त्यालाच विज देणार .याचा फटका गोरगरीब जनतेला होणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.