गडचिरोली:- मार्च 2021 नंतर राज्यासह गडचिरोली शहरातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर रुप धारण केले होते.गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्याही वाढली होती. लॉकडाऊन मूळे शहरातील सर्व हॉटेल, भोजनालाय बंद असल्यामुळे गृहविलगीकरणातील रुग्णांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता.आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे यांनी गृहविलगीकरणातील रुग्णांना निशुल्क घरपोच टिफिन पोहोचविण्याची कल्पना आपल्या फाऊंडेशन च्या सहकारी यांच्यासमोर मांडली. आणी सर्वांनी ‘चला आपले कर्तव्य निभऊ’ हा संकल्प करित गरजूंच्या हाकेला प्रतिसाद देत गृहविलगीकरणातील व्यक्तींना निशुल्क डबा पोहोचविण्याचा निर्धार केला.अशाप्रकारे रोज 20 ते 25 डबे पोहोचविले जात होते. डबे तयार करण्याची जबाबदारी आधारविश्व च्या भगिनींनी घेतली. पण डबे प्रत्येकाच्या घरी पोहोचविणे ही सर्वात मोठी समस्या होती. बऱ्याच ठिकाणी निरोप पाठवले पण डबे पोहोचवायची जबाबदारी घ्यायला कुणीही तयार होत नव्हते.सुरवातीला आधारविश्व च्या भगिनी स्वतः डबे तयार करून स्वतःच पोहोचवायचे काम करत होत्या. पण खूप धावपळ होत होती. शेवटी काही मुलांना मानधन वर डबे पोहोचवायला तयार केले. परंतु त्यादरम्यान रुपेश बालमावर आणी सौरभ धाईत हे दोन युवक देवदुता प्रमाणे धावून आले आणी निशुल्क सेवा द्यायला तयार झाले. आणी जोपर्यंत गृहविलगीकरणात रुग्ण होते तोपर्यंत म्हणजे दीड ते दोन महिने निरंतर डबा पोहोचवायचे काम केले.आजच्या युगात आणी तेही कोरोनाकाळात अश्या सेवाभावी वृत्तीचे मूलं खूप कमी बघायला मिळतात. आणी म्हणूनच 5-8-2021रोज गुरुवारी आधारविश्व फाऊंडेशन तर्फे जिल्हाधिकारी मा. दीपक सिंघला यांच्या हस्ते सौरभ धाईत या युवकाचा शाल आणी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. रुपेश बालमावर यांना वेळेवर महत्वाचे काम आल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी या युवकांची खूप प्रशंसा केली आणी आज अशा युवा पिढीची समाजात फार गरज आहे असे भावोदगार काढले. यावेळी आधारविश्व फाऊंडेशन अध्यक्षा गीता हिंगे, उपाध्यक्षा विना जंबेवार,सचिव सुनीता साळवे,सदस्या कांचन चौधरी,ad. कविता मोहरकर, दिलशाद पिराणी, जयश्री चांदेकर, गायत्री गेडाम, लीला डांगे उपस्थित होत्या