सिंदेवाही येथे क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमदार डॉ देवराव होळी यांचे सामाजिक प्रबोधनपर मार्गदर्शन
दिनांक ९ ऑगस्ट २०२१ गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील
सिंदेवाही येथील निर्मला माता मंदिर सभागृह येथे आदिवासी विकास परिषद ता, सिंदेवाही शाखा चे वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी , जिल्हा परिषद कृषी सभापती रमेश बारसागडे , कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय सोयाम , जि , स,प्र,आ,वी, प, कैलास कुमरे , वसंत सिडाम ,डॉ सचिन कण्णाके ,नागराज गेडाम समाज कल्याण सभापती ,रितेश अल्मस्त प,स, सदस्य , संयोजक निखिल कोवे , पुष्पा मडावी नगर सेविका , वर्षा ताई कुमरे आदिवासी स्वायतत्ता बचत गट अध्यक्षा व समाज बांधव यांच्या उपस्थितीत आयोजित जागतिक आदिवासी दीन कार्यक्रम साजरा करण्यात आला व उपस्थित नागरिकांनी मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला
उपस्थितांना आमदार डॉ देवराव होळी व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेश बारसागडे व उपस्थित मान्यवर यांनी मार्गदर्शन केले.
९ ऑगस्ट क्रांतिकारी तथा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जात आहे. वीर शहीद बाबुरावजी शेडमाके यांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारतमातेला मुक्त करण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला. त्यांना सळो कि पळो करून सोडले. अखेर इंग्रजांनी त्यांना फितुरीने अटक केली २१ ऑक्टोंबर १८५८ ला त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली गेली. फाशीची शिक्षा झाली असताना सुद्धा त्यांना त्याचे दुःख झाले नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे, आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा अशीच इच्छा त्यांनी आपल्या हृदयात कायम ठेवली. त्यांचे हे कार्य आजच्या तरुणांना स्फूर्ती देणारे असून ते तरुणांसाठी देशभक्तीचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी यावेळी केले व आदिवासी समाजाने एकत्र येऊन आर्थिक सामाजिक शैक्षणिक विकास करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र आत्राम व आभार माधव मसराम यांनी मानले.