चामोर्शी:- आदिवासी दिनाचे औचित्य साधून आज दिनांक :-०९/०८/२०२१ ला युवा संकल्प बहुउद्देशीय संस्था भेंडाळा द्वारा १०वी व १२वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच कोरोनाच्या काळामध्ये मोलाचा योगदान देणारे आशा वर्कर व डॉक्टर नर्स त्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. त्यामध्ये काही विद्यार्थी व आशा वर्कर यांनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. आणि परिश्रम हेच ध्येय असेही त्यांनी सांगितले. या सर्वांचा युवा संकल्प संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व पुषपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थित मा.श्री. डॉ. देवरावजी होळी साहेब आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, मा.श्री.विठ्ठलची सातपुते उप – सरपंच ग्रा. भेंडाळा, संस्थापक/अध्यक्ष मा.राहुलजी वैरागडे युवा संकल्प संस्था महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष मा. चेतनजी कोकावार युवा संकल्प संस्था महाराष्ट्र राज्य, मा.श्री.दीलीपजी चलाख भा. ज. प. ता. अध्यक्ष, मा.प्रतीक राठी युवा मोर्चा अध्यक्ष, मा.श्री जैरमाजी चलाख, मा. निखीलजी उंडिरावाडे सदस्य ग्राम.भेंडाळा, मा.श्री.साबणे साहेब वैद्यकीय अधिकारी भेंडाळा, मा.सौ. नगराडे मॅडम, मा.श्री. नरेंद्र जुवारे, मा. लखनजी झरकर, मा. दिलीपजी जवादे, मा.मोरेश्वर साखरे, मा.कृष्णा भाऊ निकुरे, आदर्श वडेट्टीवार, कपिल नंदगिरवार, अजय बुरे, अमोल सोंनटक्के, अजय चापले, कार्तिक जुवारे,नितीन सातपुते, समस्त युवा संकल्प सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते.