बाबासाहेबांच्या विचारांनीच आदिवासींची प्रगती शक्य: विलास कोडापे

104

गडचिरोली,ता.१०:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशवासीयांना शिका,संघटीत व्हा व संघर्ष करा हा मुल मंत्र दिला. त्यांच्या विचारांनीच आदिवासींची प्रगती शक्य आहे. त्यामुळे आदिवासी समाजाने बाबासाहेबांचे विचार अंगिकारावे, असे आवाहन आदिवासी परधान जमात पंचायतीचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा सहसंघटक विलास कोडापे यांनी केले.
अहेरी येथे आदिवासी परधान जमात पंचायतीच्या वतीने आयोजित जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना विधानसभा सहसंघटक विलास ठोंबरे, समाजाचे ज्येष्ठ नेते हनमंतु तलांडे, राकाँ सेवादलाचे प्रदेश सचिव बुधाजी सिडाम, परधान जमात पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास सिडाम, तालुकाध्यक्ष सुनील सिडाम, कोषाध्यक्ष संजय आत्राम, अनंत आलाम, युवा सेनेचे तालुकाप्रमुख दिलीप सुरपाम, शिवसेनेचे विधानसभा संघटक बिरजू गेडाम, विमल सडमेक, संध्या गेडाम, संतोषी मडावी उपस्थित होते.
विलास कोडापे पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित् व्हा व संघर्ष करा’, असा मंत्र दिला. त्यांचे विचार आदिवासी समाजाने कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. रात्र वैऱ्याची असून, आदिवासींचे भवितव्य अंधारात आहे. अशावेळी बाबासाहेबांचे विचारच आदिवासींना तारणारे आहेत, असेही कोडापे म्हणाले. याप्रसंगी वाढदिवसानिमित्त विलास कोडापे यांचा केक कापून व शाल देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक बबलू सडमेक, तर आभार प्रदर्शन राणी कोडापे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रोशन मडावी, आशिष सिडाम, महेंद्र आत्राम, नागेश आत्राम, सागर कुळसंगे, भूषण तलांडे, उदय सिडाम, अक्षय आत्राम, नागेश्वरी आत्राम, भाग्यश्री सिडाम, भारती सिडाम, मनिषा तलांडे, माधुरी सिडाम, अल्का तलांडे, मीना कोडापे, अरुण आत्राम व इतरांनी सहकार्य केले.
………………………………….