आष्टी:-
आष्टी येथील वाहन चालक प्रदीप चांदेकर याचे डेंगू च्या आजाराने 10 आगस्ट रोजी निधन झाले. त्यामुळे त्याच्या कुटूंबियांवर फार मोठे दुःखाचे डोंगर कोसळले. अशावेळी माणुसकीचा परिचय देत जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने प्रदिप चांदेकर यांच्या कुटूंबियांना वीस हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. संघटनेने केलेल्या या मदतीबद्दल चांदेकर कुटूंबियांनी संघटनेचे आभार मानले.
यावेळी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष किशोर शेंडे,जिल्हाध्यक्ष वीरेंद्र कांबळे, बल्लारपूर तालुकाध्यक्ष महेश बावणे,राजुरा तालुकाध्यक्ष बलवंत टाकरे,बल्लारपूर तालुका उपाध्यक्ष नाना भाऊ डीवते,आष्टी येथील हंसप्रीत राऊत, प्रफुल खंडारे, संजय कन्नाके, घनश्याम कौरासे,चेतन पोतगंटीवार,सागर चिप्पावार, प्रफुल कावडे, भुपेश गेडाम, आदी उपस्थित होते.