ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का
गडचिरोली-
गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश आज नगरविकास विभागातून जिल्हा अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला.या निर्णयाने नगरपरिषदेत सत्ताधारी असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे.
22 मे2020 रोजी भाजपचेच नगरसेवक, माजी बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार व अन्य 14 नगरसेवकांनी नगराध्यक्ष योगिता पिपरे या आपल्या पदाचा गैरवापर करून नियमबाह्य ठराव मंजूर केले तसेच भाड्याचे वाहन वापरून 11 लाख 61 हजार 914 रुपयांची नियम बाह्यपणे उचल केली या प्रकरणी योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करा अशी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली. परंतु याप्रकरणी कारवाईत दिरंगाईपणा लक्षात घेता तक्रारदार नगर सेवकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.उच्च न्यायालयाने नगरविकास विभागाला निर्णय घेण्याचा आदेश दिला.नगरविकास विभागाच्या आदेशाने नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करण्याचा आदेश काढला.
या आदेशाने भाजपला धक्का बसला असून सुरवातीपासूनच नगराध्यक्ष व इतर नगरसेवक असा वाद गडचिरोली नगर परिषदेत रंगला होता.नगराध्यक्षा च्या पतीची वाढती लुडबुड इतर नगरसेवकांना खटकत होती. यातून भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी वाढली. व नगराध्यक्ष च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. व त्यांच्यावर आरोप करण्यात आले.या आरोपाप्रकरणी अखेर नगरविकास विभागाने नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित केले.
डिसेंबर 2016 रोजी थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून योगिता पिपरे निवडून आल्या होत्या.नोव्हेंबर अखेर त्यांची मुदत संपत असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा धक्का असल्याचे मानले जात आहे.