कटेझरी येथे पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांच्या हस्ते करमणुक केंद्र (मिनी सिनेमा हॉल) व पाळणाघराचे उद्घाटन

85

गडचिरोली: भौगोलीक दृष्टया अतिदुर्गम व घनदाट जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठया प्रमाणात आदिवासी नागरिकांचे वास्तव्य आहे. जिल्ह्याच्या भौगोलिकतेचा फायदा घेवून नक्षलवादी त्यांच्या विचारसरणीचा प्रसार बंदुकीच्या जोरावर सदर आदिवासी बांधवांमध्ये करीत आहेत. नक्षलवाद्यांमुळे शासनाच्या विविध आदिवासी विकास कामाच्या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहचत नसल्याने आदिवासींच्या तसेच गावांच्या विकासास अडथळा निर्माण होत आहे. तसेच परीसरातील रहिवासी शेतात अथवा इतरत्र रोजंदारीचे काम करीत असतांना आपल्या सोबत पाल्यांना घेवुन जात असल्याने मुलांच्या संगोपणाची आबाळ होत आहे. या आदिवासी बांधवांच्या परिस्थितीचा गांभिर्याने विचार करुन धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र कटेझरी येथे, गडचिरोली जिल्हयाचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या दुरदर्शी धोरणांतर्गत पोलीस उपविभाग धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील जाधव सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कारवाफा श्री. अमोल भारती सा. तसेच पोउपनि जगन्नाथ मेनकुदळे, पोउपनि सुरेश जारवाल यांनी आदिवासी बांधवांच्या लहान मुलां-मुलींवर योग्य संस्कार होवुन प्रवाहातील शिक्षण देण्याकरीता तसेच आई-वडील कामावर गेले असतांना मुलांचे संगोपन करण्यासाठी पाळणाघराची निर्मिती आज दिनांक 6/10/2021 ला करण्यात आली. तसेच सदर परीसरात कोणतेही करमणुकीचे साधन उपलब्ध नसल्याने आदिवासी बांधव तसेच पोलीसांच्या करमणुकी करीता सिनेमा गृहाची निर्मिती करण्यात आली.

सदर पाळणाघर व सिनेमा गृहाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. तसेच सौ. आर्यता गोयल मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. सदर उद्घाटना प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) मा. श्री. समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मा. श्री. सोमय मुंडे सा. उपस्थितीत होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पोलीस उपविभाग धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील जाधव सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कारवाफा श्री. अमोल भारती सा. तसेच पोलीस मदत केंद्र कटेझरीचे पुर्व प्रभारी अधिकारी पोउपनि श्री जगन्नाथ मेनकुदळे, प्रभारी अधिकारी पोउपनि श्री सुरेश जारवाल व पोलीस अंमलदार यांनी अथक परीश्रम घेतले.