गडचिरोली:- जिल्ह्यात कोणतेही रोजगार नाही, कारखाने नाहीत शासना कडून नौकरीची पदाची भरती होते तर आपल्या कडील सुशिक्षित बेरोजगार स्पर्धेत टिकू शकत नाही, जिल्हात बेरोजगारी चे प्रमाण वाढलेले आहे, बेरोजगाराचेसाठी एक आशेचा किरण म्हणजे सूरजगाड लोह प्रकल्प, एका कंपनीने हिम्मत दाखवुन सूरजगाड प्रकल्प सुरू केले, त्या पूर्वी कंपनीने महाराष्ट्र शासना कडे विनंती केली व परवानगी मागितली, त्यां पूर्वी महाराष्ट्र शासनाने म्हटले की जिल्ह्यातीलच बेरोजगारांना रोजगार, नौकरी दयावी लागेल, यात कंपनीने होकार ही दिला व त्यानंतर प्रकल्प सुरू झाला, काही प्रमाणात बेरोजगारांनी कंपनीत काम ही सुरू केले, हजारो तरुण कंपनीत काम मिळावं या साठी कंपनी शी संपर्क करीत आहेत, अर्ज ही देत आहेत, यात बेरोजगारांना आनंदाचे दिवस आलेत असे वाटत असताना जिल्हातील काही राजकीय पक्षाचे पुढारी प्रकल्पाला विरोध करीत आहेत, विरोध करणाऱ्यांनी कधीही जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार नौकरी मिळन्यासाठी प्रयत्न केले नाहीत,महाविकास आघाडीचे सरकार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देतआहे तर त्याला काही राजकीय समाजकंटकविरोध करीत आहेत,संपूर्ण महाविकास आघाडीचे सरकार व काही समविचारी संघटना या सुरजागड लोह प्रकल्प लवकरात लवकर सुरू होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व इतरही बांधवांना रोजगार मिळेल या साठी जीवाचे राण करीत आहेत,
ज्या आदीवासी बांधवांच्या भरवशावर काही राजकीय मंडळी आपली पोळी शेकत आहेत तेच या प्रकल्पाला विरोध करीत आहेत या चर्चेला उधाण आलेले आहे,परंतु जिल्ह्यातील आदिवासी जनता अशा नतद्रष्ट राजकारण्यांना निवडणुकीत धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही,बऱ्याच वर्षा नंतर गडचिरोली जिल्ह्याला सुरजागढ प्रकल्पामुळे सुगीचे दिवस येणार असून पुढील कित्येक शतके या प्रकल्पामधून लोहखनिजाचे उत्खनन होणार आहे,चुकून हा प्रकल्प होऊ दिल्या गेला नाही असे बेरोजगार बांधवांना कळल्यास तरुणांमध्ये प्रचंड उद्रेक होऊन ते रस्त्यावर आल्या शिवाय राहणार नाही।






