Home गडचिरोली सहा वर्षीय बालकाची कर्करोगाशी झुंज संपली

सहा वर्षीय बालकाची कर्करोगाशी झुंज संपली

116

गडचिरोली,प्रतिनिधी :-
मागील आठ महिन्यापासून कर्क रोगाशी झुंज देणाऱ्या सहा वर्षीय मनन लीकेश कोडापे यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली.
गडचिरोली येथील कारगील चौकातील लिकेश भाऊराव कोडापे (स.शिक्षक,शिवाजी हायस्कूल,कुरखेडा) यांचा सहा वर्षाचा मुलगा मनन दीपा लिकेश कोडापे हा मागील आठ महिन्यापासून कर्करोगाशी झुंज देत होता. त्याच्यावर नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सर्व उपचार चे प्रयत्न झाल्यानंतर त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काही दिवसापूर्वी भरती करण्यात आले होते. आज सकाळी ४ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. कोडापे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
आज दुपारी मनन वर अंत्यसंस्कार कथांनी नदीवर करण्यात आले. यावेळी शोकसभा श्री उईके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी उदय धकाते,छत्रपती कोडापे,जितेश कुळमेथे यांनी शोक व्यक्त केला.संचालन गणेश मोहुर्ले यांनी केले.अंत्यविधी ला शेकडो नागरिक उपस्थित होते.
मनन कोडापे याच्या मागे आई वडील,आत्या आणि आजी आजोबा आहेत.

Don`t copy text!