अमिर्झात काँग्रेस पक्षाच्या वतीने जनजागरन अभियान वाढलेल्या महागाई विरोधातील लढा हा जनसामान्यांचा लढा आहे :-महेंद्र ब्राम्हणवाडे

72

अमिर्झा, गडचिरोली/:- मागील काही वर्षात केंद्रातील भाजप सरकरच्या चुकीच्या व हुकूमशाही धोरणामुळे आज देशातील पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल अशा अनेक जीवणावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले असुन यात सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर व सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सामान्य व गरीब जनतेची हातावर पोट अशी परिस्थिती निर्माण झाली असून याचेच निषेध नोंदवीन्याकरिता काँग्रेस कमिटी तर्फे अमिर्झा येथे महागाई विरोधात प्रभातफेरी जनजागरण अभियान रॅली काढून जाहीर सभा घेण्यात आली.
वाढलेल्या महागाई विरोधातील लढा हा जनसामान्यांचा लढा आहे त्यामुळे सर्व सामान्य लोकांनी यात मोठ्या संख्येने भाग घेत या अभियानात जुळावे व केंद्रातील हुकूमशाही सरकारचा निषेध करावा व येणाऱ्या निवडणूकीत त्यांना आपली जागा दाखवावी असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. यावेळी प्रदेश काँग्रेस चे महासचिव तथा माजी आ.डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा कॉंग्रेस निरीक्षक डॉ.नामदेव किरसान,प्रदेश काँग्रेस चे सचिव डॉ. नितीन कोडवते, माजी जि.अ. हसनअली गिलानी, जिल्हा काँग्रेस चे महासचिव समशेरखा पठाण, ता.काँग्रेस अध्यक्ष नेताजी गावतुरे, जितेंद्र मुनघाटे, किसान काँग्रेस ता. अध्यक्ष कृष्णाजी झंजाळ, दिवाकर मिसार, रामभाऊ ननावरे, नरेंद्र ठाकरे, श्रीकांत कातवटे, संजय चन्ने देशमुख, ढोणे, सहारे, धिवरू मेश्राम आदी काँग्रेस पदाधिकारी व शेकडो काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते