वाघाचा बळी ठरलेल्या इंदिरा उद्धव आत्राम यांच्या कुटुंबियास अनिसतर्फे मदतीचा हात

57

 चुरचुरा :-चुरचुरा येथे काही दिवसांपूर्वी झाडणीसाठी लागणाऱ्या गवती काड्या आणण्यासाठी गावातील काही महिला गावालगत असलेल्या जंगलात गेल्या असता तीथे दबा धरून बसलेल्या वाघाने साठ वर्षीय सौ. इंदिराबाई उद्धव आत्राम नावाच्या महिलेवर झडप घालून तीला तेथेच गतप्राण केले. त्यांच्या कुटुंबात पती-पत्नी शिवाय कोणीही नाही. त्या आधी त्याच गावातील दोन व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे त्या गावात बरेच दिवस वाघाची दहशत निर्माण झाली होती. तेथील शेतकरी शेतावर जायला घाबरत होते. यावर्षी तेथील शेती दैवाधिन झालेली होती. वाघाची दहशत हळूहळू कमी होत होती म्हणून गावातील लोक कोणी शेतावर तर कोणी जंगलात कामानिमित्त जाऊ लागली आणि वाघ सुद्धा शिकारीच्या मागावर होता. वाघाचा चाणाक्षपणा व माणसाचा दुर्लक्षपणा यांचा संयोग होऊन शेवटी वाघ बाईवर हाबी होऊन इंदिराबाई चा तीचा बळी घेतला. पती श्री. उद्धव आत्राम यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सांत्वनासाठी गडचिरोली येथील सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ तथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विश्वस्त डॉ शिवनाथ कुंभारे, गुरूदेव सेवा मंडळ चे जिल्हा सचिव पंडित पुडके, महा अंनिस चे जिल्हा कोषाध्यक्ष श्री गोविंदराव ब्राम्हणवाडे व महा अंनिस चे कार्यकर्ते श्री विलास निंबोरकर आदी जाऊन त्यांची व त्यांच्या आप्तेस्टांची भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. आणि कुटुंब प्रमुख उद्धव आत्राम यांना डॉ कुंभारे साहेब व इतरांच्या हस्ते सानुग्रह आर्थिक मदतीचा हात दिला व वाघाच्या बंदोबस्ता बाबत गावकऱ्यांसह सविस्तर चर्चा केली