Home गडचिरोली  श्री. वर्धराज स्वामी क्रिकेट मंडळ बोरी यांच्या वतीने भव्य रबरी बॉल क्रिकेट...

 श्री. वर्धराज स्वामी क्रिकेट मंडळ बोरी यांच्या वतीने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन  जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

123

अहेरी:- तालुक्यात येत असलेल्या बोरी येथे श्री. वर्धराज स्वामी क्रिकेट मंडळ यांच्या वतीने भव्य रबरी बाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला, दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.पहिला पारितोषिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते देण्यात येत आहे.

आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. सहउदघाटक म्हणून जि. प.सदस्या सुनीता कुसनाके होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते नितीन गुंडावार,उपाध्यक्ष डॉ.राजेश नाम्बियार, प्रमुख अतिथि म्हणून ग्राम पंचायतीचे सरपंचा शंकर कोडापे,पंचायत समिति सदस्या सौ. छायाताई पोरतेट, उपसरपंच पराग ओल्लालवार,ग्राम पंचायत सदस्य महेश सडमाके,रायपूरचे उपसरपंच सुरेश गंगाधिरिवार, वेलगुरचे उपसरपंच उमेश मोहूर्ले आदि मंचावर उपस्थित होते.यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष सोयाम, उपाध्यक्ष प्रमोद मडावी, मानवकुमार कोडापे, उमेश सेडमाके, कृष्णा पोहनकर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!