गडचिरोली, (जिमाका) दि.07:- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान ग्रामीण सन 2021-22 अंतर्गत दिनांक 06 डिसेंबर 2021 रोजी गडचिरोली जिल्ह्याचे पाल7कमंत्री तथा नगरविकास, बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), मंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महाआवास अभियान कार्यशाळा संपन्न झाली.
सदर कार्यशाळेमध्ये गोर गरीब लोकांना दर्जेदार घरे मिळावी. घरकुलाकरीतापात्र असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे व कोणताही अपात्र लाभार्थी पात्र होता कामा नये. सर्वासाठी घरे-2022 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे. अधिकारी/कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी यामध्ये सहभाग घेवून जास्तीत जास्त घरकुले पुर्ण करुन महाआवास अभियान यशस्वी करण्यासंबंधी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजना सन 2016-17 ते सन 2021-22 अंतर्गत महाआवास अभियान-2 मध्ये 13592 घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच महा आवास अभियानाचे 10 उपक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यात येतील.
सदर जिल्हास्तरीय कार्यशाळेला जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) तथा गट विकास अधिकारी, आरमोरी चेतन हिवंज, सोमेश पंधरे, तसेच तालुकास्तरावर सभापती, उपसभापती (सर्व), प्रकल्प अधिकारी एआविप्र, प्रोग्रॅमर व ऑपरेटर उपस्थित होते.