Home चंद्रपूर जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांची चंद्रपूर मनपात सदिच्छा भेट

जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांची चंद्रपूर मनपात सदिच्छा भेट

119

चंद्रपूर, ता. ९ :- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी (दि. ९) सायंकाळी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या प्रमुख प्रशासकीय इमारतीत सदिच्छा भेट दिली. यावेळी मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी त्यांचे स्वागत केले.

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील ९ डिसेंबर रोजी चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. दिवसभर खासगी आणि पक्षीय कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी मंत्रीमहोदयांनी शहरातील विविध समस्या जाणून घेतल्या. मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने राबविलेल्या विविध विकास कामांची माहिती मंत्रिमहोदयांना दिली. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

Don`t copy text!