गडचिरोली, (जिमाका) दि.09 :- दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. तरी समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी यांची नोंद घ्यावी व तक्रारी अर्जासह उपस्थित राहावे. अर्जदाराचे तक्रार ही वैयक्तिक स्वरुपाचे असावी. सेवा विषयक, आस्थापना विषयक तक्रार स्विकारल्या जाणार नाही.सदर लोकशाही दिनात महिलांनी मास्क घालने व सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य राहील असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव महिला लोकशाही दिन गडचिरोली यांनी कळविले आहे.