दिनांक 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान सिकलसेल नियंत्रण सप्ताह

60

गडचिरोली, (जिमाका) दि.09 :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हयात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने दिनांक 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2021 हा सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून सर्व सिकलसेल ग्रस्त रुग्णांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर ( LFT.KFT.HB.CBC) इत्यादी तपासणी मोफत केल्या जातील व त्यावर योग्य औषधोपचार केले जाईल.जिल्हयातील सर्व रुग्णांना आरोग्य तपासणी करण्याकरीता जिल्हा रुग्णालय सामान्य रुग्णालय , महिला व बाल रुग्णालय,गडचिरोली, उपजिल्हा रुग्णालय आरमोरी, अहेरी, कुरखेडा तसेच ग्रामिण रुग्णालय सिरोंचा, भामरागड, व कोरची येथे सकाळी 10.00 ते 5.00 वाजेपर्यंत सर्व रुग्णालयात मोफत तपासण्या करण्यात येणार आहे. तरी जनतेनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.