गडचिरोली,(जिमाका)दि.13: – राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फ, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दिनांक 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2021 रोजी ” सिकलसेल सप्ताह ” या कार्यक्रमाचा उद्घाटन महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे करण्यात आले. सकाळी कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रम झाले. तसेच सिकलसेल रुग्णाची आरोग्य तपासणी यात (CBC.LFT.KFT HB) ची तपासणी करण्यात आली. सदर कार्याक्रमाचे अध्यक्ष, वैद्यकिय अधिकारी डॉ. कन्नमवार, प्रमुख अतिथी म्हणून अजित थोरात, डॉ.प्रणब मांडवे, डॉ. अमीत राजे, डॉ. मेघा सावसाकडे व अधिसेवीका श्रीमती खेबुलवार सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्येक्रमामध्ये सिकलसेल रुग्णांची नोंद करुन सिकलसेलच्या विविध तपासणी करीता रक्त नमुणे घेण्यात आले. कार्यक्रमांच्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन वैद्यकिय अधिकारी डॉ कन्नमवार यांनी केले. यामध्ये त्यांनी सिकलसेल आजार पुढील पिढीत टाळण्याकरीता सिकलसेल रुग्णांनी विवाहापुर्वी सिकलसेल तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सिकलसेल रुग्णांनी होणारा विविध त्रासाबाबत माहिती दिली. त्यांनी सिकलसेल रुग्णांना नियमित तपासणी कारावी . व वैद्यकिय अधिकारी यांच्या सल्यानुसार औपधोपचार करण्यात यावे. जिल्हा सिकलसेल समन्वयक यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिल्ली संजयगांधी यांजने अंतर्गत रु.1000/- लाभ दिला जातो. तसेच अपंग प्रमाणपत्र, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ व डी. ई. आय. सी योजनेबाबत माहिती देण्यात आली. डॉ. प्रणव मांडवे यांनी डी. ई.आय. सी योजना मध्ये 0 ते 18 वयवर्ष वयोगटातील सिकलसेल रुग्ण व इतर आजाराच्या रुग्णांना मोफत उपचार करण्यात येते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सिकलसेल समन्वय कु. रचना फुलझेले यांनी केल तर कार्यक्रमाचे व आभार प्रदर्शन गोपाल पेंदाम यांनी केले. तर श्रीमती मिना दिवटे स्वप्नील चापले सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ व डी.ई.आय. सी कार्यक्रमाचे सहकारी कर्मचारी गोपाल पेंदाम व महिला बाल रुग्णालयातील इतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले. तसेच विशेष सहकार्य वैद्यकिय अधिक्षक महिला बाल रुग्णालय गडचिरोली डॉ .दिपचंद सोयाम यांनी केले.