गडचिरोली,(जिमाका)दि.13:- गडचिरोली जिल्हयातील दारिद्र रेषेखालील जीवन जगत असलेल्या मातंग व तत्सम समाजातील लोकांचे जिवनमान उंचविणे,समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळवण्याच्या उद्दशाने त्यांचा आर्थिक व सामाजिक व विकास होण्यासाठी मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना सामाजिक न्याय विभाग अंतर्गत 11 जुलै 1985 रोजी केली आहे.
या महामंडळात अनुदान/बीज भांडवल योजने अंतर्गत मातंग समाजातील पुढील 12 पोटजातीतील व्यक्तींना व्यवसाय करण्याकरीता अर्थसहाय्य देण्यात येते. मांग,मातंग,मीनी मादीग,मादीग,दानखणी मांग,मांग महाशी, मदारी, राधेमांग,मांग गारोडी,मादगी,मादीगा तरी मातंग समाजातील इच्छुक व्यक्तींने महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याकरीता जिल्हा कार्यालय साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय.च्या मागे कॉम्पलेक्स गडचिरोली येथे संपर्क साधावा असे जिल्हा व्यवस्थापक साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. गडचिरोली यांनी कळविले आहे.