गडचिरोली,(जिमाका)दि.14 :- समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहामधे प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे .त्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर झाले असून सन 2021 -22 या वर्षकरीता दिनांक 20 डिसेंबर 2021 पर्यंत तर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यर्थ्यांनी दिनांक 31 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. अनुसूचित जाती,अनूसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक / व्यावसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशीत विद्यार्थ्यांना या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल .त्याचप्रमाणे तालूका स्तरावर मुला / मुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता 8 वी पासून ते पुढील अभ्यासक्रमांकरिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.
शालेय विद्यार्थी इयत्ता 10 व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामधे प्रवेश घेतलेले विद्यार्थी 12 वी नंतर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत ही दिनांक 20 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यर्थ्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. प्राप्त झालेल्या अर्जानुसार दिनांक 24 डिसेंबर 2021 पहिली यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यर्थ्यानी यादी 6 जानेवारी 2022 प्रसिध्द करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्याना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तेथुन अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांकापर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत सक्षम परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहिती साठी सबंधित शासकीय वसतिगृह येथे संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.