गडचिरोली जिल्ह्यात आज 13 कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त

0
64

गडचिरोली जिल्ह्यात आज 13 कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त

गडचिरोली,()दि.27: आज गडचिरोली जिल्हयात 579 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 13 असून कोरोनामुक्ताची संख्या 13 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 38125 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37266 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 82 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 777 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.75 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.22 टक्के तर मृत्यू दर 2.04 टक्के झाला आहे.

आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 07, भामरागड तालुक्यातील 01,धानोरा तालुक्यातील 02, कोरची तालुक्यातील 02, व कुरखेडा तालुक्यातील 01जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, अहेरी तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 02,धानोरा तालुक्यातील 01 मुलचेरा तालुक्यातील 03, व कोरची तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here