वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांची खा.अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वनापर भेट

66

सेवा पंधरवडा कार्यक्रम निमित्ताने सांत्वन भेट

 

पोर‌ला वनपरिक्षेत्रांतर्गत जेप्रा,दिभना येथे वाघाची दहशत

 

या संदर्भात वनविभागाचे वनसंरक्षक अधिकारी व ग्रामपंचायत जेप्रा येथे गावकऱ्यांच्या समेत घेतला आढावा

खा.अशोकजी नेते

 

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांची खा.अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वनापर भेट

 

दिं.२४ सप्टेंबर २०२२ गडचिरोली :-सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने खा.अशोकजी नेते यांना जिल्हा महामंत्री प्रशांत जी वाघरे यांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या घटनेच्या संदर्भात माहिती दिली असता या संबधित खासदार साहेब दखल घेत मागील अनेक दिवसापासून पोरला वनपरिक्षेत्रांतर्गत जेप्रा,दिभना,या परिसरात वाघाची प्रचंड दहशत असून यामध्ये वाघाने अनेक इसमाच्या नरडीचा घोट घेतलेला आहे. त्यामुळे गावाच्या परिसरातील जनता,नागरिक पूर्णपणे भयभीत झालेली आहे.

 

जेप्रा येथील नामदेव रामजी गेडाम वय ५५ वर्ष हे दिं.२२/०९/०२२ ला शेत शिवारात बैल चराई करिता गेले असतांना तिथेच अचानक दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करून यात जागीच ठार केले

 

तसेच दि.२६/०७/२०२२ला नीलकंठ गोविंद मोहूरले रा.दिभना हे शेत शिवारात काम करीत असतांना अचानक वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.

 

या दोन्ही घटनेचा गांभीर्य लक्षात घेता खा.अशोकजी नेते यांनी वाघाचा बंदोबस्त करण्या करिता ग्रामपंचायत जेप्रा येथे या संदर्भात आढावा बैठक घेऊन वाघाची दहशत व गावातील समस्या जाणून घेऊन वाघाचा बंदोबस्त करण्याचे सूचना खा.अशोकजी नेते यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनां याप्रसंगी दिले

 

 

एकिकडे शेतीच्या कामासाठी जाणेसुद्धा आवश्यक असतांना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. या विवेचनेत जनतेचा तोडगा काढण्यासाठी खा.अशोकजी नेते यांनी आढावा घेत वनविभागाचे अधिकारी व गावकऱ्यांसोबत चर्चा सुद्धा यावेळी करण्यात आली

 

वनविभागाच्या अधिकारीऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सोलर प्लांट सुद्धा लावण्यात येईल व रस्त्यावर असलेले झुळपे, झाडे हे सुद्धा तोडण्यात येईल.तसेच गावाच्या संरक्षणासाठी किंवा काय उपाययोजना केल्या जाईल.यासाठी आम्ही सदा सर्वदा वनविभागाचे अधिकारी सेवेत आहोत. असा सकारात्मक विचार चर्चेअंती खासदार अशोकजी नेते यांना दिला*.

 

तसेच या क्षेत्राचे लोकप्रिय खा.अशोकजी नेते यांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या परिवारांला आर्थिक मदत देऊन परीवारांचे सांत्वन केले.

 

यावेळी खा.अशोकजी नेते यांनी वनविभागाचे अधिकारी यांना शासन स्तरावर तातडीने कामे करुन मदत देण्याचे निर्देश देऊन सूचना केल्या तसेच वनमंत्री मा.ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार मंत्री यांना सुद्धा दुरध्वनीवरुन फोन करून संबंधीत माहिती दिल्यानंतर याप्रसंगी सकारात्मक विचार व्यक्त केले.

 

याप्रसंगी खा.अशोकजी नेते, गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, जिल्हा महामंत्री प्रशांत जी वाघरे,उपसरपंच्या सौ.कुंदाताई लोनबले,मानकर साहेब वनसंरक्षक अधिकारी गडचिरोली,पाटील साहेब विभा..व्यव‌,महाडीक साहेब,मडावी साहेब,बोथे साहेब, सामाजिक कार्यकर्ते देविदासजी नागरे,देवानंद चलाख, बालाजी जेंगठे,बाळकृष्ण नैताम,विलास जेंगठे,दिलीप गावतुरे ग्राम. सदस्य,पुरुषोत्तम बावणे,धनराज जेंगठे,देविदास जेंगठे,उमेश मोहुरले, तसेच गावातील जनता व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.