एटापल्ली प्रभाग क्रमांक १० मध्ये कोव्हिड बुस्टर डोस लसीकरण शिबिर संपन्न
एटापल्ली शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये मा.राघव सुलवावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली यांच्या उपस्तीतीत आज दिनांक १२/१०/२०२२ रोज बुधवारला कोव्हिड बुस्टर डोस लसीकरण शिबीर आयोजित केला होता,सदर शिबिरात ६० नागरिकांनी लसीकरण करवून घेतलं.
याप्रसंगी संपत पैडाकुलवार भा.ज.प युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तनुज बल्लेवार,ओमकार मोहूर्ले, अनिकेत मामीडवार राजमुद्रा फाउंडेशन अध्यक्ष आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केलं.