आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृह एटापल्ली येथे भारतरत्न डॉ. कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणादिन” म्हणून साजरी.

66
  1. आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृह एटापल्ली येथे भारतरत्न डॉ. कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणादिन” म्हणून साजरी.

दिनांक 15 ऑक्टोबरला देशभरात भारतरत्न पूर्व राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे अब्दूल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणादिन” म्हणुन साजरी केली जाते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह एटापल्ली येथे आज दिनांक 15 ऑक्टोबर ला ‘वाचन प्रेरणा’ दिनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रा. गणेश आत्राम,जि.प.कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली, यांनी *”व्यक्तिमत्व विकास आणि परीक्षेची तयारी कशी करावी”* या विषयवार व्याख्यान दिले. यात त्यांनी विद्यार्थी जीवनातच उत्तम व्यक्तिमत्त्वाचा पाया कसा उभारावा या संबंधित मार्गदर्शन केले. तसेच परीक्षेची तयारी करतांना कोणत्या गोष्ठी लक्षात ठेवाव्या याबाबतीत माहितीपुर्ण विचार मांडले.

या कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक श्री एस.एस. हिवाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वसतिगृहातील विद्यार्थी समीर मडावी (बी ए प्रथम वर्ष) याने केले. प्रीतम पोई (वर्ग आठवी) व शरद हिचामी (बी ए प्रथम वर्ष) यांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन करून नागेश हेडो (वर्ग 12 वा) याने केली.