शेगाव येथे ३० ऑक्टोबर रोजी मराठी पत्रकार संघाचा जिल्हा मेळावा
एस एम देशमुख सह राज्यातील २७ पदाधिकारी उपस्थित राहणार
बुलढाणा (प्रतिनिधी): मराठी पत्रकार परिषद मुंबईशी सलग्नित असलेल्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हास्तरीय संवाद मिळावा व राज्यातील तसेच जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा येत्या ३० ऑक्टोबर रोजी संतनगरी शेगाव येथे इंजीनियरिंग कॉलेज च्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
८५ वर्षाची प्रदीर्घ व वैचारिक परंपरा लाभलेल्या तथा मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या नवनियुक्त अध्यक्षपदी माननीय श्री. शरदजी पाबळे साहेब व उपाध्यक्ष शरद काटकरसाहेब (पश्चिम महाराष्ट्र),श्रीमती शोभा जयपूरकर (राज्य महिला संघटक), अनिल महाजन ( राज्य जनसंपर्क प्रमुख), निवडणूक विभाग प्रमूख बाळासाहेब ढसाळ, निवडणूक सहायकप्रमूख सुरेश नाईकवाडे, डिजीटल मिडीया प्रमूख अनिल वाघमारे, तसेच अमरावती विभागीय सचिव अमर राऊत यांच्यासह आठ विभागीय सचिव यांचा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने व बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने करण्यात येणार आहे.
सोबतच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा जिल्हास्तरीय संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख साहेब, विश्वस्त किरणजी नाईक साहेब व राष्ट्रीय अध्यक्ष शरदजी पाबळे साहेब हे उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहे. या मेळाव्याला बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता संतनगरी शेगाव येथे इंजिनिअरिंग कॉलेज च्या हॉलमध्ये उपस्थित राहावे. असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, सरचिटणीस संदीप शुक्ला व कार्याध्यक्ष अजय बिल्लारी, सतीश आप्पा धुळे यांच्यासह जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.