*युवकांचा उत्साह (जोश)निर्माण करण्याकरिता मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे*…. *खा.अशोकजी नेते*

70

*युवकांचा उत्साह (जोश)निर्माण करण्याकरिता मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे*…. *खा.अशोकजी नेते*

——————————————–

*युवा कबड्डी क्लब अरसोडा ता.आरमोरी यांचे वतीने*…..

 

*भव्य रात्रकालीन खुली कबड्डी स्पर्धाच्या उदघाटक प्रसंगी* …

*खा.अशोकजी नेते.*

——————————————

 

*दिं.२६ ऑक्टोंबर २०२२*

 

*आरमोरी:-युवा कबड्डी क्लब अरसोडा तालुका आरमोरी यांचे वतीने भव्य रात्रकालीन खुली कबड्डी स्पर्धेचे शुभारंभ व उद्घाटन रीबिन कापून या क्षेत्राचे खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले*.

 

*मा.खासदार अशोकजी नेते या कार्यक्रमाच्या उद्घाटक प्रसंगी बोलतांना अरसोडा या गावी आयोजित केलेली भव्य रात्रकालीन खुली कबड्डी स्पर्धा हि कौतुकास्पद आहे. अशा मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे आहे.याचा आदर्श सर्व गावांनी घेतला पाहिजे.अशा या मैदानी खेळामुळे युवकांना उत्साह,आनंद मिळतो.खेळामुळे व्यायाम होते. युवकांचे आरोग्य हेल्थ चांगले राहते.त्यामुळे युवकांचा उत्साह (जोश) निर्माण करण्याकरिता मैदानी खेळाचे आयोजन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन या कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी केले.*

 

*अरसोडा या गावी युवकांना प्रोत्साहन देऊन मैदानी खेळाचे नियम पाळून युवकवर्गानी आनंद,उत्साहाने खेळावे. असे प्रतिपादन आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले.यावेळी भाजपाचे प्रदेश संपर्क प्रमुख श्री.सदानंदजी कुथे सर,तालुकाध्यक्ष नंदूभाऊ पेटेवार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.*

 

*याप्रसंगी खा.अशोकजी नेते. गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,आरमोरी विधानसभेचे आमदार मा.कृष्णाजी गजबे,प्रदेश संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे सर,भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदूभाऊ पेटेवार, सभापती भारत बावनथळे, नगरसेविका कीर्तीताई पत्रे,विजय अग्रवाल, प्रकाश भोयर, अशोक भोयर, नंदूभाऊ नागतोडे,तसेच अनेक गावातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.*