PET परीक्षा उत्तीर्ण होणारा राजेश हजारे यांचा एटापल्ली नगरपंचायतीचे बांधकाम सभापती राघव सुल्वावार यांच्या हस्ते सत्कार
*एटापल्ली तालुक्यातील ठरला पहिला विद्यार्थी*
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत प्रत्येक वर्षी पि.एच.डी पूर्व परीक्षा घेण्यात येते.यावर्षी सुद्धा या परीक्षेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे घेण्यात आले होते.राजेश बसवेश्वर हजारे यांनी परीक्षा दिली व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मार्फत या परीक्षेचे निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला.या निकालात राजेश बसवेश्वर हजारे यांनी उत्तीर्ण होऊन एटापल्ली तालुक्यातून प्रथम उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.राजेश बसवेश्वर हजारे यांचे मागील ६ वर्षा पासून चंद्रपूर येथे शिक्षण सुरू आहे त्यांनी अर्थशास्त्र विषयात बि.ए आणि राज्यशास्त्र विषयात एम.ए पदवी प्राप्त केली आहे व त्यांनी प्रथमच हि परीक्षा दिली होती आणि त्यांना यश प्राप्त झाल्यामुळे संपूर्ण तालुक्याचा मान वाढवला आहे.यामुळे नगरपंचायत एटापल्लीचे बांधकाम सभापती राघव सुल्वावार, नगरसेवक राहुल कुळमेथे यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी निखिल गादेवार, ओमकार मोहूर्ले,नामदेव हिचामी नगरसेवक,शुभम डोमलवार तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी प्रमोद कपाटे,लक्ष्मीकांत दुर्गे,रमेश येरमे,जगदीश बन्सोड,मधुकर अग्गुवार,किशोर मोहूर्ले,संदीप मोहूर्ले,किशोर मज्जी उपस्तीत होते.







