राष्ट्रीय अधिवेशनाचे निमंत्रण मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांना दिले.व त्यांनी येण्याचे मान्य केले.
मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी -चिंचवड येथे १९ नोव्हेंबर २०२२रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून उदघाटन करावे, यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विभागीय सचिव दिपक कैतके यांनी आज सायं.५वा. त्यांची मंत्रालयातील दालनात जाऊन भेट घेतली आणि निमंत्रण पत्र दिले. कामात व्यस्त असूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी निमंत्रण पत्र वाचून अधिवेशनाला येण्याचे मान्य केले.







