कोनसरी निर्माणाधिन पोलाद कारखान्यात होणार ४ नोव्हेंबरला बैठक
लॉयड्स मेटल्स व त्रिवेणी अर्थ मूव्हर्सचे एम.डी. प्रभाकरनजी यांना कोनसरी स्टील प्लांट भूमीधारक समितीच्या वतीने बैठक आयोजित करण्याबाबतची विनंती
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उपस्थितीमध्ये लॉयड्स मेटल्स स्टील प्लांटच्या भूमीधारक समिती कोनसरी च्या वतीने बैठकीच्या आयोजनाचे दिले पत्र*
*स्थानिकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्याची मागणी*
*दिनांक २८ ऑक्टोंबर २०२२ गडचिरोली*
*सुरजागड लोह उत्खनन प्रकल्पावर आधारित लॉयड्स मेटल कंपनी व त्रिवेणी अर्थ मूव्हर्सच्या वतीने कोनसरी येथे पोलाद कारखान्याचे निर्माण कार्य सुरू असून त्यामध्ये व सुरजागड प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी या मागणीच्या संदर्भामध्ये बैठकीचे आयोजन करावे.* *अशी मागणी करणारे पत्र आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या उपस्थितीमध्ये लॉयड्स मेटल्स स्टील प्लांटच्या भूमीधारक समिती कोनसरी च्या वतीने प्लांटचे एम.डी. प्रभाकरनजी यांना देण्यात आले.*
*याप्रसंगी समितीचे अध्यक्ष बंडूजी बारसागडे ,उपाध्यक्ष बापूजी भोगेकर, सचिव सुधाकरजी सोनटक्के ,बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी शहा, तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख व कोनसरीचे सरपंच श्रीकांत जी पावडे प्रामुख्याने उपस्थित होते.*
*कोनसरी येथील निर्माणाधीन पोलाद कारखाना तातडीने सुरू करण्यात यावा, कोनसरी येथील पोलाद कारखान्यांमध्ये प्रकल्प बाधितांना प्रथम प्राधान्याने रोजगाराची संधी देण्यात यावी , कोनसरी पोलाद कारखान्यांमध्ये परिसरातील स्थानिकांना रोजगाराची संधी द्यावी, सुरजागड येथील लोह उत्खनन प्रकल्पामध्ये सुरजागड व परिसरातील १३ बाधित गावांतील बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यात यावी ,दोन्ही प्रकल्पांमध्ये जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राधान्याने देण्यात यावी या मागणीच्या संदर्भामध्ये सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे मार्गदर्शक आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली आहे.*







