स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरीता खासदारांचा राजीनाम मागणे आंदोलन”

60

आता विदर्भ राज्याकरिता विदर्भावाद्यांची आर-पारची लढाई सुरु”

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरीता खासदारांचा राजीनाम मागणे आंदोलन”

 

देशाच्या घटनेतील कलम ३ प्रमाणे नविन राज्य निर्मितीचे अधिकार हि केंद्र सरकार व संसदेचे असल्यामुळे केंद्र सरकार बरोबरच विदर्भातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या १० हि खासदारांनी विदर्भ राज्य निर्मिती बाबत त्यांची व त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे? हे जाहीरपणे स्पष्ट करण्यास विदर्भातील १० हि खासदारांना त्यांच्या-त्यांच्या मतदार संघातील विदर्भवादी राज्याच्या आर्थिक स्थितीच्या पुराव्यासह पोष्टाद्वारे , स्वहस्ते, व्हॉट्स अप व इ-मेलद्वारे १० नोव्हेंबर पर्यंत पत्रव्यवहार करण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे करण्यात आले. विदर्भातील त्यांच्या खासदारकीच्या कालावधीत प्रामुख्याने सत्ताधारी पक्षाचे (भाजपाचे) खासदार असूनही व त्यांच्या पक्षाने व त्यांच्या नेत्यांनी विदर्भातील जनतेला २०१४ साली सत्तेत आल्यास विदर्भ राज्याच्या निर्मितीचे जाहीर अभिवचन दिले होते व या मागणी करिता आमगाव ते खामगाव विदर्भ राज्याचा जागर केला होता. परंतु २०१४ व २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकी नंतर सत्तेत येऊन हि विदर्भाचे राज्य मिळवून देण्यास सरकार म्हणून व लोक प्रतिनिधी म्हणून अपयशी ठरले आहे. जनतेच्या आशा आकांक्षा धुळीस मिळवल्या म्हणून त्यांनी खासदार म्हणून खुर्चीत राहण्याचं अधिकार गमावल्यामुळे त्यांचा

दि.११/११/२०२२ रोजी त्यांचे कार्यालया समोर जाऊन त्यांचा राजीनामा मागणे आंदोलन होणार आहे. गडचिरोली येथिल खासदार मा. अशोकजी नेते यांचे चार्मोशी रोड वरिल कार्यालया समोर ” राजीनामा मागणे ” आंदोलन दुपारी १२ – ३० वाजता होणार आहे. सदर आंदोलनात विदर्भवादी जनतेने सहकाऱ्या सह सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक अरुण पाटील मुनघाटे, गडचिरोली जिल्हा उत्तर अध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, गडचिरोली जिल्हा दक्षिण अध्यक्ष अशोक पोरड्डीवार, जिल्हा उपाध्यक्ष घीसू पाटील खुणे ,शालीक नाकाडे ,रमेश उप्पलवार ,महिला आघाडीच्या अमिता मडावी ,अर्चना चुधरी, सुनिता मडावी ,युवा आघाडीचे ग्यानचंद सहारे ,चंद्रशेखर गडसुलवार ,नासिर जुम्मन शेख, गोवर्धन चव्हाण, चंद्रशेखर जक्कनवार, केवलराम सालोडकर, दादाजी चाफाले, बंडुजी जुवारे ,नुर पठाण, बाबुराव भोवरे इत्यादींनी एका पत्रकातून केले आहे.