नगरपंचायत एटापल्लीत १ कोटी ५६ लाखांचे काम मंजूर नगराध्यक्षा दिपयंती पेंदाम यांच्या हस्ते भूमिपूजन

64

नगरपंचायत एटापल्लीत १ कोटी ५६ लाखांचे काम मंजूर नगराध्यक्षा दिपयंती पेंदाम यांच्या हस्ते भूमिपूजन

 

बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार यांच्या पाठपुराव्याला यश

 

 

एटापल्ली नगरपंचायत स्थापन होऊन ७ वर्ष लोटले असून दोन वेळा काँग्रेस पक्षाने सत्ता स्थापन केले असतांना नगरपंचायत अंतर्गत विकास कामे करण्यात आलेत परंतु चालू आर्थिक वर्षात नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये यापूर्वी विकास कामांकडे नगरपंचायतने तांत्रिक अडचणी मुळे कोणतेही बांधकाम केले नव्हते परंतु प्रभाग क्रमांक १० मधून निवडणूक लढवून निवडून आलेले नगरसेवक तथा बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार यांनी प्रभागाचा दुजाभाव न बाळगता रस्ते व सांड पाण्याचा नाली सारख्या बांधकाम विरहित आणि विकास हिन असलेल्या प्रभाग क्रमांक १४ व ७ मध्ये १ कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी देऊन सदर प्रभागातील कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी नगरपंचायतच्या सभेत सुल्वावार यांनी वारंवार उठाव करून कामे मंजूर करून नगरपंचायतीचे अध्यक्षा दिपयंती पेंदाम यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात केले आहे तसेच नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून प्रभाग क्रमांक १० व प्रभाग क्रमांक ०३ मध्ये ५६ लक्ष रुपयाचे कामांना मंजुरी देऊन सदर दोन्ही कामे सुरू करण्यात आले.

सदर कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला न.पं अध्यक्षा दिपयंती पेंदाम सह बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार, पाणीपुरवठा सभापती किसन हिचामी, म.बा. सभापती तारा गावडे, म.बा.उपसभापती कविता रावलकर, नगरसेवक निजान पेंदाम, राहुल कुळमेथे, बिरजू तिम्मा, नामदेव हिचामी, स्थापत्य अभियंता सौरभ नंदनवार, विवेक साखरे, कंत्राटदार गौतम अधिकारी, पुणेश्वर खोब्रागडे, उमेश शहा सह नागरिक उपस्तीत होते.

 

 

*प्रतिक्रिया*

“मि संपूर्ण १७ ही प्रभागाचा सभापती असल्याने प्रभागाचा दुजाभाव न करता ज्या प्रभागात अडचणी जास्त आहेत त्या प्रभागाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल”

*-राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली*