मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात चर्चासञ व परीसंवाद पत्रकारां साठी महत्त्वाचे ठरणार मान्यवराची उपस्थीती चिञपट अभिनेते खा. अमोल कोल्हेची प्रगट मुलाखत

50

मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात चर्चासञ व परीसंवाद पत्रकारां साठी महत्त्वाचे ठरणार मान्यवराची उपस्थीती चिञपट अभिनेते खा. अमोल कोल्हेची प्रगट मुलाखत

पुणे (प्रतिनीधी) मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आकर्षण केंद्र म्हणून तीन कार्यक्रमाचा उल्लेख होत असून. यामध्ये आम्ही अँकर हे चर्चसञ त्याच बरोबर डिजिटल मीडिया प्रिंट मीडियाला धोका ठरतोय का हा परीसंवाद व खा. अमोलजी कोल्हे यांची प्रगट मुलाखत या तीन कार्यक्रम हे येणाऱ्या पत्रकार बांधवां साठी महत्त्वाचे व आकर्षक ठरणारा असून या अधिवेशनातील कार्यक्रमाचा लाभ सर्व उपस्थित पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे जनसंपर्कप्रमुख अनिल महाजन यांनी केले

मराठी पञकार परीषदेच्या 43 व्या पिंपरी चिंचवड येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय आधिवेशनत विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सध्या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू असून चर्चा सञ व परिसंवाद हे महत्वाचे ठरणार असून

आम्ही अँकर हे चर्चासत्र आकर्षक ठरणार असून यामध्ये रोज आपल्या समोर टीव्ही चॅनलवर दिसणारी अँकर मंडळी ही रोज त्यांच्या समोर असणाऱ्या समस्या व त्यांचे प्रश्नही मांडणार आहेत त्यांचे अनूभव कथन करणार आहे. या चर्चासत्रात न्यूज 18 लोकमतचे मिलिंद भागवत, विलास बडे, एबीपी माझाचे अश्विन बापट, झी 24 तास च्या अनुपमा खानविलकर, रेश्मा साळुंखे, टि व्ही 9 च्या निकिता पाटील यांचा सहभाग असणार आहे या बरोबरच दि डिजिटल मीडिया प्रिंट मीडियाला धोका ठरतोय का या महत्त्वपूर्ण विषयावर व सध्या पत्रकार चर्चेच्या असणाऱ्या विषयावर परिसंवाद होणारा असून या चर्चासत्रास अध्यक्षस्थानी जेष्ठ माध्यमकर्मी समिरण वाळवेकर, हे तर या चर्चासञात सकाळचे समूह संपादक सम्राट फडणीस, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक पराग करंदीकर, मॕक्स महाराष्ट्राचे संपादक रवी अंबेकर, जेष्ठ संपादक तुळशीदास भोईटे यासह परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख परिषदेचे विश्वस्त किरण नाईक परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे आदींची उपस्थिती या चर्चासत्रात लागणार आहे हे दोन्हीही चर्चासत्र या अधिवेशनाचे केंद्रबिंदू ठरणारा असून आकर्षणही येणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचे ठरणार आहे त्याचप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीतील शिवछत्रपती म्हणून ओळखले जाणारे चित्रपट अभिनेते खा. अमोल कोल्हे यांची प्रगट मुलाखत हेही आकर्षण ठरणारा असून त्यांची मुलाखत मिलिंद भागवत व विलास बडे ही ज्येष्ठ अँकर मंडळी घेणार आहे. हे अधिवेशन यशस्वी करण्या साठी पिंपरी चिंचवड पञकार संघाचे पदाधीकारी परीश्रम घेत आहेत. यामुळे या अधिवेशनात होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचा लाभ येणाऱ्या पत्रकारांनी उपस्थिती लावून घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन यांनी केले आहे.

—————————————————————-

प्रती

मा.श्री. संपादक व जिल्हा प्रतिनीधी

कृपया मराठी पञकार परीषदेचे 43वे राष्ट्रीय अधिवेशनातील महत्वाचे परिसंवाद, चर्चासञ व प्रगट मुलाखत संबंधी बातमी प्रकाशीत करण्या साठी पाठवत आहे तरी प्रकाशीत करून सहकार्य करावे हि विनंती

आपला

अनिल महाजन

राज्य जनसंपर्क प्रमूख

मराठी पञकार परीषद, मुबंई