बर्दापूर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
*आदर्श मैत्री फाउंडेशन चा उपक्रम*
*अंबाजोगाई प्रतिनिधी*
अंबाजोगाई तालुक्यात बर्दापूर येथे आदर्श मैत्री फाउंडेशन व उदयगिरी नेत्रालय व रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त उपक्रमातून येत्या सोमवारी 21 11 2022 रोजी महादेव मंदिर बर्दापूर येथे सकाळी दहा ते चार या वेळेत मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येणार आहे रुग्णांनी तपासणी करता आपले ओळखपत्र व आधार कार्ड सोबत घेऊन उपस्थित रहावे व जास्तीत जास्त रुग्णांनी तपासणी करून घ्यावे असे आव्हान आदर्श मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श मैत्री फाउंडेशन बर्दापूर शाखेचे अध्यक्ष पप्पू बाहेती ,घाटनांदुर शाखेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण चव्हाण परळी शाखेच्या अध्यक्षा सौ शुभांगी ताई पतंगे यांच्यासह आदर्श मैत्री फाऊंडेशनचे सर्व सदस्य यांच्यासहअनेकांनी केले आहे तर मोफत नेत्र तपासणी शिबिराचे नियोजन बर्दापूर स्वच्छता कमिटी ने कॅम्प नियोजनयांनी केले आहे
कृपया आपल्या माध्यमातून प्रसिद्ध करावे ही नम्र विनंती
अंबाजोगाई दर्शन






