अपघातात जखमी झालेल्या चपराळा येथील युवकाची मृत्यूची झुंज अखेर अपयशी.

98

अपघातात जखमी झालेल्या चपराळा येथील युवकाची मृत्यूची झुंज अखेर अपयशी.

 

 

गडचिरोली-

चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील अपघातात जखमी झालेल्या 30 वर्षीय युवकाची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली असून दिनांक 26 नोव्हेंबर शनिवारी सकाळी सहा वाजता नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

रुपेश सुरेश बास्पेनवार वय 30 वर्ष मू पो चपराळा ता. चामोर्शी जी गडचिरोली असे मृतक युवकाचे नाव आहे.

 

रुपेश हा त्याच्या मित्रासोबत दुचाकीने गडचिरोली येथून काम आटोपून परत येत असताना नवेगाव कुनघाडा नजिक त्याची दुचाकी नालीत कोसळली यात रुपेश आणि त्याचा मित्र सोनू बहिरेवार जखमी झाले. रुपेश हा गंभीर जखमी असल्याने त्याला चंद्रपूर वरून नागपूर ला रेफर करण्यात आले अखेर नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

रुपेश हा पोलीस भरतीची तयारी करत होता. नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत तो केवळ काही गुणांनी त्याची निवड हुकली होती. त्याच्या अशा अपघाती मृत्यूने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.