गडचिरोली जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक व कृषी अधिकारी चाळीस हजार रुपयांची लाच घेताना एसिबी च्या जाळ्यात.
गडचिरोली –
जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय गडचरोली तेथील लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक व तालुका कृषी अधिकाऱ्यास चाळीस हजार रुपयांची लाच घेताना गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.ही कारवाई दिनांक सात डिसेंबर बुधवारी करण्यात आली.
1) श्री संदीप अशोकराव वैद्य , वय 33 वर्ष, वरिष्ठ लिपीक, लेखा विभाग, जिल्हा अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली, वर्ग -3
2) श्री प्रदीप पुंडलीक वाहाने, वय 49 वर्ष, तालुका कृषी अधिकारी, अति. प्रभार उपविभागीय कृषी अधिकारी गडचिरोली, वर्ग -2 असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार हा आरमोरी 42वर्षीय पुरुष असून
तक्रारदार यांनी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कम्बाईन हॉर्व्हेस्टर खरेदी केल्याने अनुदानाची रक्कम रुपये 11.00 लाख त्यांचे बँक खात्यात जमा केल्याचा मोबदला म्हणून आरोपी क्र. 1 श्री संदीप अशोकराव वैद्य यांनी 50,000 रुपये लाच रक्कमेची मागणी करुन तडजोडीअती स्वत: व आरोपी क्र. 2 यांचेसाठी 40,000/- रुपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली. गै.अ. 1 यांनी स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने तक्रारदार यांचेकडून 40,000 रुपये लाच रक्कम
स्विकारतांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय समोरील चंद्रपूरकडे जाणा-या मुख्य रस्त्याचे बाजूस असलेल्या श्री चंद्रप्रकाश गेडाम यांच्या चहाटपरी येथे स्विकारतांना रंगेहाथ मिळून आले. तसेच आरोपी क्र. 1 यांन स्विकारलेल्या लाच रक्कमेस आरोपी क्र 2 यांनी सहमती दर्शवून लाच रक्कम रुपये 40,000/- पैकी 20,000/- रुपये पंच साक्षीदारासमक्ष उपविभागीय कृषी कार्यालय गडचिरोली येथे स्विकारल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. राहुल माकणीकर , ला.प्र.वि. नागपूर,
मा. श्री मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर. यांच्या मार्गदर्शनाखाली
पर्यवेक्षक अधिकारी :-
मा. श्री. सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. गडचिरोली.
पो.नि. शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजेश पदमगीरवार, स्वप्निल बांबोळे, किशोर जौंजारकर, श्रीनिवास संगोजी, पोशि किशोर ठाकूर, संदीप उडाण , मपोशि जोत्सना वसाके, यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.





