Home गडचिरोली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी व राष्ट्रीय ओबीसी महासंघ व व्यापारी...

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी व राष्ट्रीय ओबीसी महासंघ व व्यापारी संघटना गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी*

114

*महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी व राष्ट्रीय ओबीसी महासंघ व व्यापारी संघटना गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी*

 

*संताचे विचार घरोघरी पोहचविण्याची काळाची गरज- जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर*

 

 

गडचिरोली :- संतांचे विचार व कार्य हे कुठल्याही विशेष गटापूर्ती मर्यादित न राहता ते संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत व ते घराघरात पोहचविण्याची काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर यांनी केले जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा पुन्हा मिळवून लिहून काढण्याचे काम संत संताजी जगनाडे महाराजांनी केले. तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांपैकी एक होते. दोघांची कर्मगाथा, जीवनगाथा एकमेकांशिवाय अपूर्ण ठरते. संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे संत तुकारामांचा पट्टशिष्य, महाराष्ट्रातील तेली समाज घडविणारे, तेली समाजाचे आराध्यदैवत, समाजसुधारक आणि राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती दिनांक ८ डिसेंबर रोजी शिव फर्निचर दिवटे कॉम्प्लेक्स रिलायन्स पेट्रोल पंप समोर चंद्रपूर रोड गडचिरोली येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी व राष्ट्रीय ओबीसी महासंघ व व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती साजरी करण्यात आली.

संत शिरोमणी राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व जय संताजी च्या गजरात संताजीच्या जीवनात प्रकाश टाकण्यात आला. प्रमुख मार्गदर्शन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सेवा आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष भय्याजी सोमनकर सर यांनी केले तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ टेभूर्णे यांनी पण संत जगनाडे महाराज विषयी मार्गदर्शन केले. व युवा नेते चांदुभाऊ नैताम यांनी पण संतांन विषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आकाश आंबोरकर यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार पंकज खोबे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा युवा आघाडी जिल्ह्याध्यक्ष राहुल भांडेकर, उपाध्यक्ष वैभव जुवारे, विदर्भ विभागीय प्रसिद्धी प्रमुख राष्ट्रीय ओबीसी महासंघ पंकज खोबे, वामनरावजी बुरांडे, मनोज पिपरे, आकाश सोनटक्के, अजय सोमनकर, सोमनाथ उईके, चंदू नैताम दुशांत कुनघाडकर, इंडियन ऑटोमोबाईलचे संचालक राजू नैताम, विवेक हार्डवेअर चे संचालक विवेक कोहळे, महाराष्ट्र मशनारिजचे संचालक रोहनकर साहेब, जय हनुमान ट्रेडर्स चे संचालक विनोद काटवे, मोहिन फेब्रिकेशन चे संचालक, मोहीन पटाण, चूडाराम तूंकलवार,नोनेश्वर मेश्राम, वीकेश दुधबडे, रितिक काटवे, इ. यशस्वीतेसाठी मोलाचं योगदान लाभले व आदि बहुसंख्येने समाज उपस्थित होते.

Don`t copy text!