जुनी पेन्शन योजना देऊ तर आम्हीच देऊ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे आवाहन

134

जुनी पेन्शन योजना देऊ तर आम्हीच देऊ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे आवाहन

———————————————-

*नागो पुंडलिक गाणार यांना प्रचंड मताने निवडून द्या. खासदार अशोकजी नेते*.

———————————————-

दिं. २५ जानेवारी २०२३

 

गडचिरोली:- राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व शंभर टक्के अनुदान देण्यात येईल.जुनी पेन्शन योजना देऊ तर आम्ही देऊ यासाठी स्वतंत्र एक प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी या विषयावर ३० तारखेनंतर लागलीच बैठक घेऊन आपला सर्वांचा वकील म्हणून मी आपली बाजू मांडताना शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शनची आवश्यकता किती आहे.हा विषय मी नक्की निकाली काढून घेईल.असे आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केले.

 

शिक्षकांच्या समस्या लक्षात घेत पुढे बोलतांना या राज्यामध्ये विनाअनुदानित शाळेच्या नावाखाली माझ्या राज्यात शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनींना वेदनापासून वंचित ठेवण्याचे पाप जर कोणी केले असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारनी केलेला आहे.परंतु २०१४ पासून राज्यात बीजेपीचे सरकार आले आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाजूच्या भावना समजून घेऊन यांना सर्वात प्रथम अनुदानित आणण्याचे काम जर कोणी केले असेल तर आपल्या या भाजपाच्या सरकारनी केले आहे.मागील अडीच वर्षाच्या काळात पुन्हा तीन तिघाडी काम बिघाडी असे तिन पायावरचे सरकार आले पण कोणत्याही शाळांना अनुदान दिलेले नाही.नुकतेच आपलं सरकार आल्याबरोबर राज्यात विना अनुदानित टप्प्यावरच्या शाळांना यांच्याकरिता तब्बल ११६० कोटीची मदत केली आहे.राज्यात संपूर्ण कर्मचाऱ्यांना ३१ मार्च २०२३ पूर्वीच प्राप्त होईल.त्यामुळे जुनी पेन्शन योजना देऊ तर आम्हीच देऊ असे सुतोवाच आव्हान या मेळाव्या प्रसंगी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केले.

 

खासदार अशोकजी नेते यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना शिक्षकांच्या पेन्शन महाराष्ट्रामध्ये ०१ नोव्हेंबर २००५ पासूनच्या कर्मचाऱ्यांना नाकारली असेल तर हे पाप काँग्रेस सरकारचे आहे.हे पाप धुण्याचं काम आपल्या भाजप पक्षाचं सरकारच करु शकते या बाबतचे सुतोवाच सुद्धा मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी नुकतेच केले आहे.

त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न मांडणारा नागो पुंडलिक गाणार हा अभ्यासु सच्चा व्यक्तिमत्व कार्यकर्ता आहे. त्यांना निवडून दिल्यास शिक्षकांचे प्रश्न नक्कीच सुटतील.त्यामुळे नागो गाणार यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या.असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार तथा जिल्हा निवडणूक प्रमुख अशोकजी नेते यांनी केले.

 

गडचिरोली येथील फंक्शन हॉलमध्ये नागपुर विभाग शिक्षक मतदार संघ,भारतीय जनता पार्टी, बालासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले)महायुतीचे अधिकृत उमेदवार नागो पुंडलिक गाणार यांच्या प्रचारार्थ शिक्षक मतदार व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आले.

 

या मेळाव्याला प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे,संचालन जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे व आभार प्रमोद पिपरे यांनी केले.

 

याप्रसंगी खासदार अशोकजी नेते, आ.देवराव होळी,आ.कृष्णाजी गजभे, माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम,जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, भाजप जेष्ठ नेते बाबूराव कोहळे,प्रदेश सरचिटणीस भाजपा एस.टि मोर्चाचे प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री (संघटन)रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे,गोविंदजी सारडा,प्रमोद पिंपरे,महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद जिल्हा अध्यक्ष संतोष सुरावार,महिला आघाडी प्रदेश सदस्या सौ. रेखाताई डोळस,जेष्ठ नेते रमेश भुरसे,यु.मो.जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये,प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, संपर्कप्रमुख सदानंदजी कुथे सर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,उपाध्यक्ष भारत खटी, गोपाल मुंनघाटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो शिक्षक मतदार वृंद प्रामुख्याने उपस्थित होते.

 

शिक्षक मेळाव्यात कॉंग्रेसचे जिल्हा सचिव संजय पंदिलवार यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्तासह भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने जिल्हा कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले असल्याचे मानले जात आहे.