माथरा येथे प.पू. नामदेव महाराज रोकडे यांच्या पुण्यस्मरनार्थ भव्य कीर्तन महोत्सव संपन्न
*श्री गुरुदेव दत्त संप्रदायिक मंडळ माथरा तर्फे कीर्तन महोत्सवाचे आयोजन*
राजुरा तालुका प्रतिनिधी
खामोना ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत माथरा येथे श्री गुरुदेव दत्त संप्रदाय मंडळ च्या वतीने दीं १९ जाणे. ते २३ जाणे. पर्यंत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सतत पाच दिवस चाललेल्या या कीर्तन महोत्सवामध्ये रोज महाराजांनी प्रबोधन केले.
माथरा येथे आयोजित पाच दिवशीच्या सप्ताहाने संपूर्ण नगरी हरिनामाने दुमदुमली. त्यामध्ये रोज सकाळी ग्राम सफाई व्हायची त्यानंतर भजनाच्या धूनित रोज रामधून पालखी निघायची. पहिल्या दिवशी ह.भ. प. तुमदे महाराज यांच्या हस्ते हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली व माराजांचे दोन दिवसीय कीर्तन प्रबोधन झाले.
तिसऱ्या दिवशी ह.भ. प. पुरुषोत्तम महाराज यांचे कीर्तन होते त्यादिवशी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर प्रमुख पाहुणे माजी सभापती तथा तालुकाध्यक्ष भाजप सुनील उरकुडे, भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, सरपंच हरिदास झाडे,भाजपा चे प्रदीप बोबडे, दिपक झाडे,प्रकाश फुटाणे, उपसरपंच शारदा तलांडे, ग्रा. प. सदस्य मारोती चांने, सोनी ठक, अलका वैद्य व अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व ह.भ. प. महाराजांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
त्यानंतर रोजच्या कार्यक्रमानुरुप गोहोकर महाराज, म्हसे महाराज, व रात्री सौ ह.भ. प. काळे यांचे कीर्तन झाले. रोज सायंकाळी माथरा परिसरातील जनता हरिपाठ मध्ये सहभागी व्हायची तसेच शेवटच्या दिवशी माथरा ग्रामवाशियांतर्फे पालखीचे आयोजन करून अनेकांनी पालखी मध्ये सहभाग घेतला. तसेच ह.भ. प. माणिकराव रोकडे महाराज यांनी काल्याचे कीर्तन व प्रवचन केले तेव्हा शेकडो भाविकांची उपस्थिती होती. त्याच दिवशी गावचे सरपंच हरिदास झाडे यांच्या हस्ते सर्व देणगी दात्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच ह.भ. प. नामदेव महाराज रोकडे यांचे नाव संपूर्ण तालुक्याच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध केल्याबद्दल सरपंच हरिदास झाडे यांचा सपत्नीक रोकडे महाराज संस्थान आजनगव तर्फे सत्कार करण्यात आला. शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले होते त्याचा परिसरातील हजारो जनतेनी आस्वाद घेतला.
सप्ताह च्या यशस्वीतेसाठी शंकर लांडे, सुरेश वांढरे, संभा क्षीरसागर,दिलीप वैद्य, श्रावण विधाते, हरिदास लेडांगे,रवींद्र लांडे, वासुदेव लांडे, गणपती झाडे, चंद्रभान झाडे, रामदास चाहरे, दिवाकर चाहरे, नरेश मुठ्ठलकर, मंगेश काळे, बापूजी क्षीरसागर, मारोती क्षीरसागर, बंडू धोटे,दिपक पहाणपटे, वैभव लांडे, धनंजय चिडे, गजानन ताजने, मंगेश वांढरे,अतुल चाहारे व समस्त ग्रामावशियांनी परिश्रम घेतले.