अविकसित भागातील खेळाडूंना संधी देण्यासाठी अशा विदर्भ स्तरीय टूर्नामेंट ची आवश्यकता आहे   खा.श्री अशोकजी नेते

95

अविकसित भागातील खेळाडूंना संधी देण्यासाठी अशा विदर्भ स्तरीय टूर्नामेंट ची आवश्यकता आहे   खा.श्री अशोकजी नेते

*चामोर्शी येथे विदर्भ स्तरीय क्रिकेट चे भव्य आयोजन

*शहरांमध्ये क्रिकेट व इतर खेळाकरिता फार स्कोप व सुविधा असतात पण गडचिरोली सारख्या अविकसित आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागात खेळाडू आहेत मात्र त्यांना संधी उपलब्ध होत नाही या विदर्भ स्तरीय क्रिकेट टूर्नामेंट मुळे अविकसित भागातील खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळणार असल्याने हा स्तुत्य उपक्रम आहे अस मत खासदार श्री अशोक जी नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा यांनी व्यक्त केले* *गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील “संताजी नगर” येथे विदर्भस्तरीय टूर्नामेंटचे उद्घाटन करून ते उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते* य *टूर्नामेंटचे प्रास्ताविक भाषण टूर्नामेंटचे आयोजक नगरसेवक व भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री श्री आशीषजी पिपरे यांनी केले यावेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्री प्रकाश गेडाम यांनीही उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले* . *या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून सौ सोनाली ताई पिपरे नगरसेविका न नगरपंचायत चामोर्शी ह्या होत्या* *मंचावर माजी न्यायाधीश सुनील जी दीक्षित, डॉक्टर नरोटे, युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य स्वप्निल वरगंटे, श्री संदीप पंदीलवार, श्री माणिक कोहडे, श्री अविनाश जी तालापल्लीवार, श्री आईंचवार, श्री धोडरे ,श्री रमेशजी अधिकारी,आदिवासी आघाडी चे जिल्हा सरचिटणीस रेवनाथ जी कुसराम,प्रामुख्याने उपस्थित होते*

*चामोर्शी नगरपालिकेच्या पटांगणातुन भव्या अशी रँली काडण्यात आली होती*