Home गडचिरोली घोटसुर व पिपली बुर्गी येथील शेतकऱ्यांची धान खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर शेतकऱ्यांची...

घोटसुर व पिपली बुर्गी येथील शेतकऱ्यांची धान खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर शेतकऱ्यांची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

172

घोटसुर व पिपली बुर्गी येथील शेतकऱ्यांची धान खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर शेतकऱ्यांची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

*एटापल्ली*….तालुक्यातील घोटसुर व पिपली बुर्गी येथील धान उत्पादक वनहक्क धारक शेतकऱ्यांनी आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वात गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांची भेट घेऊन आविका मार्फत धान खरेदी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 

घोटसुर व पिपली बुर्गी येथील वनहक्क धारक शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या धान आविका कडून खरेदी करण्यात येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेलं आहे.येथील शेतकऱ्यांना वनहक्क दाव्यांतर्गत कायम पट्टे मिळाले असून फक्त त्या पठ्यांचे संबंधित विभागाने संगणकीकरण न केल्याने याची फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. सगळीकडे धान खरेदी प्रक्रिया हे संगनीकृत करण्यात आल्याने आता शेतकरी उत्पादन केलेल्या धानाची ऑनलाईन झाल्यानंतरच आविका धानाची खरेदी करत असतात.मात्र येथील शेतकऱ्यांची ऑनलाईन मध्ये सातबाराची नोंदच न झाल्याने धान खरेदी करण्यास आविका ने हात वर केले. यामुळे येथील घोटसुर व पिपली बुर्गी येथील शेतकऱ्यांनी माजी आमदार आत्राम यांची भेट घेऊन धान खरेदीत होणाऱ्या अडचणी त्यांना सांगितले.यावर माजी आमदार आत्राम यांनी बाधित शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांना या बाधित शेतकऱ्यांची समस्या त्यांना सविस्तरपणे सांगितले व शेतकऱ्यांच्या त्यांना निवेदन ही दिले.

 

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतांना माजी आमदार आत्राम यांच्यासोबत नीलकंठ निकोडे, राजु इष्टाम, नकोलास केरकेट्टा, किशोर टोपो, अशोक इष्टाम, गणेश शेंडे, देवू पोट्टावी, तनिसलाल मिंज, सुधीर टोपो, जयदेव मोहुर्ले, सुधीर टोपो, देवू उसेंडी, किशोर इष्टाम,जुलेख शेख,विनोद कावेरी आदी उपस्थित होते.

Don`t copy text!