*तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न*
पंडित दिनदयालजी उपाध्याय विचार मंच जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने भव्य तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा दिनांक २४ जानेवारी २०२३ ला घेण्यात आले होते.या स्पर्धेत तालुक्यातील चार शाळेच्या १२८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१,द्वितीय ३००१,तृतीय २००१ रुपये मा.अशोकजी नेते साहेब खासदार यांचे कडून देण्यात आले.या स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम आज जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती न.पं.एटापल्ली,मा.विनय चौहान सर मुख्याधापक जि.प.शाळा एटापल्ली,मा.बिरजू तिम्मा नगरसेवक न.पं. एटापल्ली,मा.संपत पैडाकुलवार भा.ज.पा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या कु.कल्याणी नैताम,द्वितीय क्रमांक कु.योगेश्वरी चौधरी,तृतीय क्रमांक कु.शर्वरी सरकार यांना देण्यात आले तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.याप्रसंगी मा.प्रमोद रामटेके सर,मा.मनोज बन्सोड सर,मा.मनीष ढाली,मा.अधीर घरामे,मा.सुनील येनगंटीवार,मा.मनोज इरले सर,मा.छाया श्रीरामे मॅडम,मा.आरती राठोड मॅडम,मा.ज्योती कोस्केवार मॅडम,दमन मेडीवार व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.







