Home गडचिरोली एटापल्ली तालुक्यातील पारपनगुडा ते वाघेझरी पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याची मागणी

एटापल्ली तालुक्यातील पारपनगुडा ते वाघेझरी पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याची मागणी

132

एटापल्ली तालुक्यातील पारपनगुडा ते वाघेझरी पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याची मागणी

 

 

*माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वात ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांची कार्यकारी अभियंताना निवेदन*

 

 

*एटापल्ली*….तालुक्यातील वाघेझरी ग्राम पंचायत अंतर्गत पारपनगुडा ते वाघेझरी पर्यंत पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत डांबरीकरण रस्ता मंजूर असून या रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरू करण्याची मागणी येथील ग्राम पंचायत चे पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले.

 

सदर रस्ता सन 2017-2018 मध्ये मंजुर झाले असून अद्याप या रस्त्याचे बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्याने या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होत असून लोकांना दळण वळणात त्रास होत असल्याने गावकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

 

पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंताना निवेदन देतांना माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे सोबत वाघेझरीचे सरपंच विलास कोंदामी,ग्राम पंचायत सदस्य रघुनाथ मोहूर्ले,सुधाकर गोटा,पोलीस पाटील देवराव झोरे आदी उपस्थित होते.

Don`t copy text!