Home गडचिरोली सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवचैतन्य,आनंद, उत्साह निर्माण होतो… उद्घाटन प्रसंगी खासदार अशोकजी...

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवचैतन्य,आनंद, उत्साह निर्माण होतो… उद्घाटन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांचे प्रतिपादन

96

शि.एस‌.इंग्लिश पब्लिक स्कुल,देवरी च्या वतीने सांस्कृतिक, स्नेह संमेलन,कार्यक्रमाचे आयोजन

———————————————

*सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवचैतन्य,आनंद, उत्साह निर्माण होतो… उद्घाटन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांचे प्रतिपादन*

———————————————–

दिं.०४ जानेवारी २०२३

 

देवरी:-शि.एस.इंग्लिश पब्लिक स्कुल देवरी च्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्साह,आनंद या आयोजीत कार्यक्रमा प्रसंगी संपन्न झाला.

 

सांस्कृतिक स्नेह संमेलन या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात,विद्यार्थीनी जीवनामध्ये दुरदृष्टी,सहनशीलता, जिद्द,चिकाटी,लगन,धैर्य,आकांशा,ह्या जीवनात समावेश करुन उज्वल भविष्य घडवावे असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी केले.

 

यावेळी विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत गीतगायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवित सादरीकरण केले.

 

याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, माजी राज्यमंत्री राजकुमार जी बडोले,शिक्षण महर्षी तथा संस्थापक झामसिंगजी येरणे, संस्थेचे सचिव तथा भाजपा तालुकाध्यक्ष अनिलभाऊ येरणे,पिले सर,कृष्णाताई येरणे,जयश्री ताई येरणे,इंदरसिंग भाटिया प्रविण अग्रवाल, शिवकुमार परिहार,राजु खोब्रागडे,ईमरान खान,सुरेश राठोड, हितेश डोंगरे,तसेच शिक्षकवृंद, विद्यार्थी, विद्यार्थीनी,व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बालकांचे कौतुक केले.

Don`t copy text!