Home गडचिरोली श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य उल्लेखनीय खासदार अशोकजी नेते

श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य उल्लेखनीय खासदार अशोकजी नेते

90

*अवभूती शिक्षण संस्था, आमगाव श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह*….

———————————————-

*श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य उल्लेखनीय खासदार अशोकजी नेते*

———————————————–

दिं.०४ जानेवारी २०२३

 

आमगांव:- श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या अवभूती महाविद्यालय आमगांव येथे जयंची समारोह साजरी करण्यात आली.

 

या कार्यक्रमा प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांनी आमगांव येथे तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणारे,आणि खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देणारे ज्ञानाचे भगीरथ म्हणजे श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी आहेत यांनी केलेले शैक्षणिक, सामाजिक कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी याप्रसंगी केले.

 

यावेळी श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मान्यवरांचे स्वागत केले.

 

याप्रसंगी केंद्रियमंत्री फगतसिंगजी कुलस्ते, खासदार अशोकजी नेते, खासदार सुनीलजी मेंढे,जिल्हाध्यक्ष तथा संस्थापक केशवराव मानकर आमदार विजय रांहागळाले,माजी आमदार भैरसिंगजी नागपुरे,अध्यक्ष भ.शि.सं.चे सुरेश बाबु असाटि, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार,रमेश कावळे,हरिहर मानकर,तसेच अनेक मान्यवर,शिक्षकवृंद,विद्यार्थी विद्यार्थिनी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!