गोंडवाना विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकाच्या भरती प्रक्रियेत एस.टी. प्रवर्गाला आरक्षण द्या आ. डॉ. देवरावजी होळी यांची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे मागणी
*मुंबई मंत्रालयात भेट घेऊन दिले याबाबतचे निवेदन*
*३० सहाय्यक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेत मध्ये एकही जागा एस टी प्रवर्गासाठी आरक्षित नाही.*
*दिनांक ८/२/२०२३ मुंबई*
*गोडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे होणाऱ्या ३० सहाय्यक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये एकाही जागेवर एस.टी प्रवर्गाला आरक्षण न मिळाल्याने आदिवासी भागातील एस.टी. उमेदवारांवर प्रचंड अन्याय झालेला आहे . त्यामुळे या भरती प्रक्रियेमध्ये एसटी प्रवर्गाला आरक्षण देऊन भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.*
*त्यांनी नुकतीच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांची मुंबई मंत्रालयात भेट घेतली व याबाबतचे निवेदन दिले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते अरुण भाऊ हरडे व प्रामुख्याने उपस्थित होते.*
*गोडवाना विद्यापीठाच्या या भरती प्रक्रियेमध्ये ३० जागांमध्ये एकही आदिवासी उमेदवारासाठी आरक्षित न होणे ही आश्चर्याची गोष्ट आहे. आदिवासी बहुल असलेल्या या जिल्ह्यामध्ये विद्यापीठ असून या जिल्ह्यात भरती प्रक्रियेमध्ये आदिवासी उमेदवारांना योग्य संधी देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. येथील आदिवासी समाजाला या विद्यापीठाच्या माध्यमातून अध्यापनाची संधी मिळाल्यास येथील स्थानिक भाषेचा या स्थानिक विद्यार्थ्यांना अधीक लाभ मिळू शकतो. तसेच येथील उच्चविद्याविभूषित आदिवासी समाजातील तरुणांनाही इथेच संधी मिळाल्यास त्याचा जिल्ह्यालाही लाभ होईल. त्यामुळे आदिवासी उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी या भरती प्रक्रियेमध्ये एसटी प्रवर्गाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉ देवरावजी होळी यांनी मंत्रिमहोदयांकडे केली आहे.*