Home गडचिरोली सर्वसामान्य महिलांच्या न्याय, हक्कासाठी परिश्रम घ्या*        *भाजपा महिला...

सर्वसामान्य महिलांच्या न्याय, हक्कासाठी परिश्रम घ्या*        *भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष वनिताताई कानडे यांचे प्रतिपादन*

81

*सर्वसामान्य महिलांच्या न्याय, हक्कासाठी परिश्रम घ्या*

*भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष वनिताताई कानडे यांचे प्रतिपादन*

 

*गडचिरोली येथे भाजपा महिला आघाडीची जिल्हा पदाधिकारी बैठक*

 

गडचिरोली :- दि. 12 फेब्रुवारी

*जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील सर्व सामान्य महिला हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. अनेक महिला शासनाच्या विविध लाभदायक योजना पासून वंचित आहेत. तसेच अनेकांना योजनेचा लाभ प्रत्यक्षात मिळत नाही अनेक निराधार व विधवा महिलांना संजय गांधी निराधार व इतर योजनांचा लाभ मिळत नाही. त्यांच्या अनेक अडी-अडचणी व समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. महिला पदाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महिलांना न्याय मिळवून देऊन त्यांना संजय गांधी निराधार योजना व जनहिताच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या व कल्याणकारी योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न महिलांनी करावा व त्यांच्या न्याय, हक्कासाठी परिश्रम घ्यावे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ वनिताताई कानडे यांनी केले. गडचिरोली येथे आयोजित भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा पदाधिकारी बैठकीत महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.*

 

*पुढे बोलताना त्या म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांकडून व नागरिकांकडून धन्यवाद मोदीजींचे पोस्ट कार्ड भरून घ्या तसेच महिलांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडविण्याचा कसोशीने प्रयत्न करा सर्व समाज घटकातील जास्तीत जास्त महिलांना भारतीय जनता पार्टी मध्ये जोडण्याचा प्रयत्न करा व कुठलीही निवडणूक असो किंवा पक्षाने दिलेल्या कोणताही उमेदवार असो त्या भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकजुटीने परिश्रम घ्या. टीव्ही वृत्तपत्राच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची व कार्याची माहिती स्वतः जाणून घेऊन आपल्या वरिष्ठ नेतेमंडळी कोण-कोणते उपक्रम राबवितात याची माहिती जाणून घेऊन आपले पक्षाचे कार्य तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत व महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम सर्व स्तरावर करा असे आवाहनही यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वनिताताई कानडे यांनी केले.*

 

*भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीची महत्त्वपूर्ण बैठक 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे पार पडली या बैठकीला विशेष अतिथी म्हणून खासदार अशोकजी नेते उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी सौ वनिताताई कानडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महिला मोर्चा च्या प्रदेश सदस्य रेखाताई डोळस, महिला मोर्चा च्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे, जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, भारती ढोरे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, जिप च्या माजी समाज कल्याण सभापती रंजिताताई कोडाप, चामोर्शी पं स च्या माजी सभापती आकुलीताई बिश्वास, जिल्हा उपाध्यक्ष प्रितीताई शंभरकर उपस्थित होत्या.*

*याप्रसंगी खासदार अशोक नेते, महिला आघाडी च्या प्रदेश सदस्या रेखाताई डोळस, जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांनीही महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. संचालन जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके यांनी तर आभार प्रतिभाताई चौधरी यांनी मानले.*

 

*या बैठकीला भाजपच्या महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष तालुका महामंत्री, सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत /नगरपरिषदेचे नगरसेवक, माजी नगरसेवक तसेच सर्व महिला आघाड्यांचे पदाधिकारी , महामंत्री उपस्थित होते.*

Don`t copy text!