Home गडचिरोली पिण्याच्या पाण्याच्या तपासणी बाबतचे प्रशिक्षण

पिण्याच्या पाण्याच्या तपासणी बाबतचे प्रशिक्षण

80

पिण्याच्या पाण्याच्या तपासणी बाबतचे प्रशिक्षण

भामरागड :13/02/2023: जिल्हा परिषद गडचिरोली स्वच्छ भारत मिशन कक्ष जल जीवन मिशन अंतर्गत पंचायत समिती भामरागड येथे ग्रामसेवक, जलसूरक्षक यांना गावातील पाणी गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या तपासणी बाबतचे एक दिवसाचे प्रशिक्षण पंचायत समिती भामरागड येथे देण्यात आले. यावेळी पाणी तपासणी ही FTK संचाने करणे, रासायनिक, जैविक पाणी नमुने प्रयोग शाळेत तपासणी करिता घेऊन जाणे, कोणत्या घटकाची पिण्याच्या पाण्याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते याचे संपूर्ण प्रशिक्षण दरम्यान मार्गदर्शन करण्यात आले. पाणी नमुन्याची WQMIS वर ऑनलाईन एन्ट्री करण्याबाबत ची माहिती सदर प्रशिक्षण कालावधीत देण्यात आली. दूषित पाणी स्रोतांवर वेळेत उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी प्रशिक्षण कालावधीत कार्यक्रमाला गट विकास अधिकारी स्वप्नील मगदूम , पंचायत विस्तार अधिकारी देव्हारे sir,जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ रवींद्र बुरम, उपविभागीय समन्वयक (पाणी गुणवत्ता ) देवानंद सुरपाम, बीआरसी दुर्गे ,आदी मान्यवर,जलसुरक्षक उपस्थित होते.

Don`t copy text!