Home गडचिरोली धानोरा येथील वार्षिक आमसभेला आपल्या समस्यांसह आवर्जून उपस्थित रहा*  आमदार डॉक्टर...

धानोरा येथील वार्षिक आमसभेला आपल्या समस्यांसह आवर्जून उपस्थित रहा*  आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन

86

*धानोरा येथील वार्षिक आमसभेला आपल्या समस्यांसह आवर्जून उपस्थित रहा*

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन*

 

*१६ फेब्रुवारीला धानोरा तालुक्याची वार्षिक आमसभा*

 

*ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सेवक, यासह अपेक्षित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी न चुकता आमसभेला उपस्थित राहावे*

 

*धानोरा जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या पटांगणावर १६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता वार्षिक आमसभेचे आयोजन*

 

*दिनांक १५/२/२०२३ गडचिरोली*

 

*धानोरा पंचायत समितीची वार्षिक आमसभा दिनांक १६ फेब्रुवारीला सकाळी ११ वा. वाजता जिल्हा परिषद शाळा शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आली असून या वार्षिक आमसभेला तालुक्यातील जनतेने आपल्या समस्या सोडविण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जनतेला केले आहे.*

 

*या आमसभेला अपेक्षित असणाऱ्या सर्व ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सेवक, यासह अपेक्षित सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी न चुकता आवर्जून उपस्थित रहावे अशी सूचना त्यांनी या माध्यमातून दिली आहे.*

 

*आपल्या अतिक्रमित जमीनीच्या समस्या, वनपट्टे, घरकुल,शेतजमिनी , पाण्याच्या समस्या, सिंचना संदर्भात समस्या , शासकीय योजनांच्या संदर्भातील समस्या अशा विवीध समस्या सोडवण्यासाठी या आमसभेला जनतेने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी या माध्यमातून केले आहे.*

Don`t copy text!