अनखोडा येथील कबड्डी स्पर्धेचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते उ्दघाटन* सहउदघाटक म्हणून भाजपा नेते संजय पंदिलवार यांची उपस्थिती

80

*अनखोडा येथील कबड्डी स्पर्धेचे आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते उ्दघाटन*

सहउदघाटक म्हणून भाजपा नेते संजय पंदिलवार यांची उपस्थिती

गडचिरोली-

 

चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे छत्रपती कब्बडी संघाच्या वतीने 24 ते 26फेब्रुवारी असे तीन दिवसीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी स्पर्धेचा उदघाटन सोहळा 24 फेब्रुवारी शुक्रवारी पार पडला. या स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. तर सहउदघाटक म्हणून भाजप नेते संजय पंदिलवार, अध्यक्ष माजी जिल्हा परीषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, उपाध्यक्ष गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे तर प्रमुख अतिथी म्हणून अनखोडा येथील सरपंच सौ रेखाताई येलमुले, उपसरपंच वसंत चौधरी, आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार कुंदन गावडे, भाजप चामोर्षी तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, चक्रपाणी पा. येलमुले, दिलीप कुरवटकर, भंतेश निमसरकार, लक्ष्मण पोटे, कडोलीचे सरपंच जितेंद्र हुलके, संतोष बारापात्रे, संध्या कुकुडकर रागिंनी डोर्लीकर, सुरेखा मेश्राम, सुरेश कोसरे महेश चहारे, संतोष वाकुडकर, छगन गुरुकर जगदीश तोकल पल्ली वार ललित पाटील इजमनकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉ, देवराव होळी यांनी या क्रीडा स्पर्धेतून ग्रामीण भागातील खेळाडूना एक प्रकारची संधी मिळत असून यातून खेळाडूंच्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास होतो. तसेच भारत सरकारने खेलो भारत अभियानाच्या माध्यमातुन खेळाडूना प्रशिक्षण देऊन दर्जेदार खेळाडू तयार करीत असल्याचे सांगितले, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, चक्रपाणी पाटील येलमुले व माजी जिल्हा परीषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले व पाहुण्यांच्या उपस्थितीत मशाल पेटविण्यात आली. या कब्बडी स्पर्धेच्या कार्यक्रमाला छत्रपति कब्बडी संघाचे पदाधिकारी , अनखोडा गावातील क्रीडाप्रेमी स्त्री व पुरुष मोठ्यासंख्येनी उपस्थित होते.