आष्टी येथील अपघाताने मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबियांना खासदार अशोकजी नेते यांच्याकडून गंदम परिवाराला आर्थिक मदत व सांत्वना भे

131

*आष्टी येथील अपघाताने मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबियांना खासदार अशोकजी नेते यांच्याकडून गंदम परिवाराला आर्थिक मदत व सांत्वना भेट*

———————————————–

दिं.२५ फेब्रुवारी २०२३

 

आष्टी:- आष्टी येथील रहिवासी स्व. भगवान लिंगया गंदम वय २२ वर्ष हा एक गरीब कुटुंबातील केस विकण्याचा व्यवसाय करीत होता.तो आपले व्यवसाय आटोपून घरी परत येत असतांना रस्त्यावरील अचानक वाटेत त्याचा अपघाती निधन झाले.खासदार अशोकजी नेते हे तालुका अहेरी कार्यकारिणीची बैठक आटोपून येत असतांना वाटेत दूरध्वनीवरून भाजपाचे नेते संजय पंदिलवार यांनी सांगीतले. या संबंधितची माहिती मिळताच आज गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक जी नेते यांनी गंदम परिवारास भेट देऊन परिवाराचे सांत्वन करून आर्थिक मदत दिली.

 

यावेळी प्रामुख्याने भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे, प्रदेश संघटन सरचिटणीस एस.टि मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, भाजपाचे संजयजी पंदिलवार, मिडियाचे आनंद खजांजी,आयुष पंदिलवार तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.